31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Home५० वर्षात प्रथमच जमिनीवरील चक्रीवादळाचा समुद्रात धुमाकूळ

५० वर्षात प्रथमच जमिनीवरील चक्रीवादळाचा समुद्रात धुमाकूळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नेहमी समुद्रातून चक्रीवादळ निर्माण होतात आणि जमीनवर येऊन बरसतात. परंतु गुजरामधील अरबी समुद्रात उलटा प्रवास होत आहे. गुजरातमध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता समुद्रात परिणाम दिसत आहे. समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याला ‘आसना’ हे नाव दिले आहे. ‘आसना’मुळेच गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये अतीवृष्टी झाली.

भारतीय हवामान विभागाने कच्छमधील खाडीवरील जमिनीवर चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती दिली. या चक्रीवादळास ‘आसना’ हे नाव पाकिस्तानने दिले आहे. गेल्या ५० वर्षांत चक्रीवादळ समुद्राच्या किनारी असलेल्या जमिनीवर तयार झाल्याचे हे पहिले उदाहरण आहे. गुजरात आणि पाकिस्तानमधील कच्छजवळील भागात आणि ईशान्य अरबी समुद्रावर तयार झालेल्या खोल दाबामुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे ६ किमी/तास वेगाने पश्चिमेकडे अरबी समुद्रात सरकले आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार, ‘आसना’ चक्रीवादळ १९४४, १९६४ आणि १९७६ मध्ये आले होते. यापूर्वी १९७६ मध्ये ओरिसामधील जमिनीवर चक्रीवादळ आहे. १९४४ मध्ये आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले होते. त्यानंतर १९६४ मध्ये चक्रीवादळ गुजरातच्या किना-यावर तयार झाले होते.

वाढत्या तापमानाचा परिणाम
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनीही एक्सवर ट्विट लिहीत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, उत्तर अरबी समुद्रावर झालेला बदल पाहून आश्चर्य वाटते. या महिन्यात उत्तर अरबी समुद्र थंड असतो हे आपल्याला नेहमीच माहीत आहे. परंतु आता येथे चक्रीवादळ तयार झाले. म्हणजे हा भाग गरम आहे. जे ग्लोबल वॉर्मिंग आणि स्थानिक पातळीवर वाढत्या तापमानाचा परिणाम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR