22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूर७ ते ९ फूट उंचीच्या वृक्षांची होणार लागवड

७ ते ९ फूट उंचीच्या वृक्षांची होणार लागवड

लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्ह्यातील अत्यल्प असलेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी ‘वृक्ष लागवड विशेष अभियान’ लातूर-२०२४ राबविण्याचा लातूर जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. या अभियाना अंतर्गत ७ ते ९ फुट उंचीची मोठी झाडे लावली जाणार आहेत. या वृक्षांची पुढील तीन वर्ष संगोपनाची जबाबदारी शासकीय यंत्रणा, शैक्षणीक सामाजीक संस्था यांचेकडे सोपवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १६ विभागांना पत्र काढून जिल्हयाचे वनक्षेत्र वाढवण्यासाठी आपले नियोजन कळवण्यासाठी सुचित केले आहे.
जिल्हयातील अत्यल्प असलेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी वृक्ष लागवड विशेष अभियान राबविण राबविताना स्थानिकांना विश्वासात घेवून नियोजन करावे. वृक्ष लागवडीचे सुयोग्य ठिकाण निश्चीत करणेसाठी वन विभाग, सामाजीक वन विभाग यांचे सहाय्य घेण्यात यावे. त्याचप्रमाणे या अभियानामध्ये सामाजीक संस्था, शैक्षणीक संस्था यांचा अधिकाधिक सहभाग होईल, यासाठी प्रयत्न करावे. विशेष म्हणजे ७ ते ९ फुट उंचीची झाडे लागवड करण्यासाठी योग्य जागांची निवड करावी.
लातूर जिल्हयात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लातूर जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सहाय्यक आयुक्त, नगरपालीका प्रशासन, जि. का. लातूर, विभागीय वन अधिकारी (सामाजीक वनिकरण), लातूर, विभागीय वन अधिकारी, प्रादेशीक विभाग, धाराशिव, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग-१, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग-२, लातूर, कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नांदेड, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, लातूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर, शिक्षणाधिकारी (माध्यमीक), प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,  पोलीस मुख्यालय, लातूर यांनी आपल्या परिसरात आगामी काळात करण्यात येणा-या वृक्ष लागवडीच्या संदर्भाने दि. २१ मे पर्यंत माहिती सादर करण्याच्या संदर्भाने सुचित केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR