22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूर८ मध्यम प्रकल्पांत ८ टक्केच पाणीसाठा 

८ मध्यम प्रकल्पांत ८ टक्केच पाणीसाठा 

लातूर : प्रतिनिधी
यंदा सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा या ८ मध्यम प्रकल्पांत केवळ ८.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने त होत असून तावरजा, व्हटी आणि तिरु या मध्यम प्रकल्पांतील प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
मागणच्या वर्षी लातूर जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले. भरवश्याचा परतीचाही पाऊस पडला नाही. लातूर शहराला पाणीपुवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडला  नाही.  परिणामी मांजरा, तेरणा, रेणा, तिरुसह जिल्ह्यातील अन्य नद्या  वाहिल्या नाहीत. या नद्यांवर असलेल्या मध्यम प्रकल्पांत अपेक्षित प्रमाणात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबरअखेरपासुनच पाणीटंचाई जाणवु लागली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी कृती आरखडा तयार करण्याच्या सूचना करुन त्यास मंजूरीही दिली. सध्या मार्च महिना असला तरी उन्हाचे चटके अधिक प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वर गेला आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यातील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे. जिल्ह्यात लघू प्रकल्प १३४ आहेत.  या प्रकल्पांमध्येही पावसाळ्यात पुरेसा जलसाठा झाला नव्हता. दरम्यान या प्रकल्पांतील पाण्याचा शेती, पशुधनासाठी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळीत घट झाली आहे. सध्या ३३.०१८ दशलक्षघन मीटर प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा आह. त्याची टक्केवारी १०.५१ अशी आहे. जिल्ह्यातील एकुण ८ मध्यम प्रकल्पांपैकी तावरजा, व्हटी, तिरु या तीन मध्यम प्रकल्पात प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा हा जानेवारीमध्येच जोत्याखाली गेला आहे. उर्वरीत पाच माध्यम प्रकल्पांत ८.६१ टक्के पाणीसाठा आहे. मसलगा मध्यम प्रकल्पात सर्वाधिक असून तो २४.५३ टक्के आहे. रेणापूर प्रकल्पात ८.७३, देवर्जनमध्ये १०.८५, साकोळ १५.०७, घरणी मध्यम प्रकल्पात ११.४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR