17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeराष्ट्रीयअग्नीवीरांना १० टक्के आरक्षण

अग्नीवीरांना १० टक्के आरक्षण

 व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज

चंदीगड : हरियाणा सरकारने अग्निवीरांच्या बाबत मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अग्निवीर योजनेबाबत मोठी घोषणा केली. हरियाणा सरकार पोलिस भरती आणि खाण रक्षक (मायनिंग गार्ड) भरतीमध्ये अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देईल असे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सांगितले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) या केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. हरियाणा सरकारने अग्निवीर जवानांना पोलिस भरती आणि खाण रक्षक भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. तसेच, राज्यातील गट क आणि ड भरतीमध्ये वयात ३ वर्षांची सवलत देण्याचा, याशिवाय गट क भरतीमध्ये ५ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यासोबतच कोणत्याही अग्निवीर जवानाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR