चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२०० किलो गोमांस पडकण्यात आले आहे. तेलंगणातून आलेल्या टेम्पोमधून हे गोमांस विक्रीसाठी बाजारात नेण्यात येत होते. मात्र, पोलिसांना टीप मिळाल्यानुसार त्यांनी योग्य तो सापळा रचून हे गोमांस जप्त केले. या प्रकरणी ५ जणांना अटकही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्यात केला असून यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, बीफ खाण्यास सरकारने बंदी घातलेली नसल्याने या कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. दरम्यान, याच मुद्यावरून गोरक्षकांकडून कत्तलखान्यात नेण्यात येणा-या जनावरांची किंवा गोवंशांची माहिती पोलिसांना देण्यात येते. गोवंश हत्या करुन मोठ्या प्रमाणात मांसाची तस्करीही केली जाते. त्यातच चंद्रपूर पोलिसांनी गाय-बैलांचे तब्बल १२०० किलो मांस जप्त केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.