27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेच्या तिस-या यादीत १३ उमेदवार जाहीर

मनसेच्या तिस-या यादीत १३ उमेदवार जाहीर

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिस-या यादीत मनसेने १३ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर आणि ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत.

यादी
१. पप्पू उर्फ मंगेश पाटील – अमरावती
२. दिनकर धर्माची पाटील – नाशिक पश्चिम
३. डॉ.नरसिंग भिकाणे – अहमदपूर-चाकूर
४.अभिजित देशमुख – परळी
५.सचिन रामू शिंगडा – विक्रमगड
६.वनिता शशिंकात कथुरे – भिवंडी ग्रामीण
७.नरेश कोरडा – पालघर
८.आत्माराम प्रधान – शहादा
९.स्रेहल सुधीर जाधव – वडाळा
१०. प्रदीप वाघमारे – कुर्ला
११.संदीप पाचंगे – ओवळा माजिवाडा
१२.सुरेश चौधरी – गोंदिया
१३.अश्विन जयस्वाल – पुसद

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR