भंडारा : भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणी मध्ये मोठा स्फोट झाला असून आतापर्यंत १३ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एक इमारत पूर्णत: उडाली असून कामगार दगावल्याची माहिती आहे. नेमके किती कामगार दगावले व जखमी किती याची माहिती मिळालेली नाही.
दरम्यान जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार आयुध निर्माणी जवाहर नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एक स्फ़ोट झालेला असून त्यामध्ये काही काम करणारे कर्मचारी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आले आहे.
यापूर्वीही झाली होती घटना
जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) २७ जानेवारी २०२४ मध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यातएक कर्मचारी ठार झाला होता. कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला होता.