परभणी : परभणी विधानसभा मतदार संघात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर मागील ९ वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहेत. या तपासणी दरम्यान हृदय विकार असलेल्या १४ बालकांना हृदय शस्त्रक्रियासाठी आज दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तपोवन एक्स्प्रेसने छत्रपती संभाजी नगरला पाठविण्यात आले. या बालकांवर मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या बजाज हॉस्पिटलला बाल हृदयरोग तज्ञ डॉ.महेंद्रसिंग परिहार हृदय शस्त्रक्रिया करणार आहेत. या सर्व शस्त्रक्रियेचा खर्च आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.
परभणी विधानसभा मतदार संघात मागील ९ वर्षांपासून परभणी शहरासह ग्रामिण भागातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरातून मोतीबिंदू, हृदयरोग किंवा ज्या लहान बालकांना हृदयाच्या समस्या आढळल्या आहेत अशा रूग्णांना मोठ्या शहरांत शस्त्रक्रीयेसाठी पाठवून त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे मोतीबिंदू मुक्त परभणी जिल्हा असा संकल्प आ. डॉ. पाटील यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत आज पर्यंत हजारो मोतीबिंदू रूग्णांवर मुंबई येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात आलेल्या आहेत. या शस्त्रक्रीयांचा सर्व खर्च तसेच रूग्णांच्या प्रवास व राहण्याची सुविधा आ. डॉ. पाटील यांच्याकडून करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात १४ बालकांना हृदय विकाराची समस्या आढळून आली होती. या बालकांवर शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते. त्यामुळे आ. डॉ. पाटील यांनी या सर्व बालकांच्या शस्त्रक्रिया खर्चाची जबाबदारी घेतली. या सर्व बालकांना तपोवन एक्सप्रेसने गुरूवारी छत्रपती संभाजी नगर येथील बजान हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या सर्व बालकांवर बाल हृदयरोग तज्ञ डॉ. महेंद्रसिंग परीहार हृदय शस्त्रक्रिया करणार आहेत. बालकांच्या हृदय विकारावरील शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग सुकर झाल्याने बालकांच्या पाल्यासह नातेवाईकांनी आ. डॉ. पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार पाटिल, आरोग्य विभाग प्रमुख राहुल कांबळे, संदीप आस्वार व पालक आदी उपस्थित होते.