18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र१४ शेतमजूर निवडणूक रिंगणात

१४ शेतमजूर निवडणूक रिंगणात

गोंदिया : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघातून एकूण ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी तब्बल १४ मजुरांनी आपला व्यवसाय हा शेती व मजुरी असल्याचे निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. एकीकडे निवडणूक लढविणे आता सोपे राहिले नाही असे म्हटले जात असतानाच शेती आणि मजुरी करणा-या १४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यामध्ये गोंदिया विधानसभा मतदारसंघातून १ तर तिरोडा विधानसभा मतदारसंघातून १३ मजूर निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघातील राजेश हनवतलाल डोये यांचा तर तिरोडा विधानसभा मतदारसंघातून चंपालाल दशरथ साठवणे, दिनेश दुधराम टेकाम, राजेंद्र दिलीप सोयम, राजेश माधोराव आंबेडारे, अजय विश्वनाथ अंजनकर, खुशाल देवाजी कोसरकर, कैलाश बुधराम गजभिये, राजेश मयाराम तायवाडे, गणपत डुलीचंद रहांगडाले, निरज भूमेश्वर मिश्रा, निलेश प्रदीप रोडगे, राजेंद्र दामोदर बोंदरे व सोनू रमेश टेंभेकर यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR