22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयहत्येप्रकरणी पीएफआयच्या १५ जणांना फाशीची शिक्षा

हत्येप्रकरणी पीएफआयच्या १५ जणांना फाशीची शिक्षा

कोच्ची : केरळमधील भाजपाच्या एका नेत्याच्या हत्येप्रकरणी कोर्टाने चार वर्षांनंतर निकाल दिला आहे. या क्रूर हत्येप्रकरणी कोर्टाने दोषी ठरविण्यात आलेल्या सर्व आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेलले सर्व आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) शी संबंधित होते.

भाजपाच्या ओबीसी विंगच्या एका नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळमधल एका कोर्टाने १५ दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व आरोपी बंदी घालण्यात आलेल्या पीएफआय या संघटनेशी संबंधित आहेत. शनिवारी यापैकी १५ जणांना कोर्टाने दोषी ठरवले होते. आज त्यांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या या घटनेमध्ये आठ आरोपी सहभागी होते. तर उर्वरित आरोपींना गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. आता कोर्टाने या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

केरळमधील भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन यांची १९ डिसेंबर २०२१ रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. आरोपींनी अलाप्पुझामध्ये श्रीनिवासन यांच्या घरामध्येच त्यांच्या कुटुंबीयांसमोर त्यांची हत्या करण्यात आली होती. सर्व आरोपी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR