15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये बस प्रवासात १६ तोळे सोने लांबवले

बीडमध्ये बस प्रवासात १६ तोळे सोने लांबवले

बीड : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. बस प्रवासादरम्यान पिशवीतील तब्बल सोळा तोळे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे.
पाटोदा ते परळी प्रवासादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बस प्रवासामध्ये एका दाम्पत्याच्या शेजारी एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन बसली. त्यानंतर तिने दाम्पत्याची नजर चुकवून त्यांच्या पिशवीतील तब्बल १६ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बीडच्या पाटोदा ते परळी प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या परळी शहरातील रहिवासी असलेल्या शशिकला ढाकणे या पती नामदेव ढाकणे यांच्यासह पुण्याहून बसने परळीला येत होत्या. त्यांची बस पाटोदा येथे दुपारी पोहोचल्यानंतर एक महिला तिच्या मुलासह या बसमध्ये बसली. ही महिला प्रारंभी शशिकला ढाकणे यांच्या शेजारी बसली व मुलाला नामदेव ढाकणे यांच्या शेजारील दुस-या सिटवर बसवले. थोड्या वेळाने ही महिला नामदेव ढाकणे यांच्या शेजारी बसली व मुलाला शशिकला यांच्या शेजारी बसवले. दरम्यानच्या काळात मस्साजोग येथे बस येताच ही महिला उतरून गेली. त्या अगोदरच तिने ढाकणे यांच्या पिशवीतील सोने, चांदीचे जवळपास ५ लाख १२ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR