20.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeराष्ट्रीयफार्मा कंपनीच्या स्फोटात १७ कर्मचारी जिवंत जळाले

फार्मा कंपनीच्या स्फोटात १७ कर्मचारी जिवंत जळाले

अच्युथापुरम : आंध्र प्रदेशातील अच्युथापुरम येथे बुधवारी एका फार्मा कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत आतापर्यंत १७ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजय कृष्णन यांनी सांगितले की, एसेन्शिया फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला होता.

अच्युथापुरम स्पेशल इकॉनॉमिक झोन मधील फार्मास्युटिकल कंपनी एशिंटियामध्ये लंच ब्रेक दरम्यान हा स्फोट झाला. अधिका-यांनी सांगितले की, लंच ब्रेक दरम्यान कंपनीच्या आवारात झालेल्या स्फोटानंतर मोठी आग लागली. कर्मचा-यांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी इमारतीच्या तिस-या मजल्यावर अडकलेल्या कामगारांची सुटका केली. जखमींना अनकापल्ले येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली आहे.

स्फोटाच्या वेळी कंपनीत सुमारे ३०० कर्मचारी उपस्थित होते. स्फोट इतका शक्तिशाली होता की इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. स्फोटामुळे आजूबाजूच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर कंपनीबाहेर जमलेल्या कर्मचा-यांनी पीडितांना नुकसान भरपाई आणि निष्काळजीपणाबद्दल अधिका-यांना शिक्षा करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या स्फोटावर शोक व्यक्त केला आहे. अनकापल्लेच्या जिल्हाधिका-यांशी बोलून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. जखमींवर उत्तम उपचार व्हावेत, असे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR