28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeसोलापूर"देऋब्रा" च्या पाठांतर स्पर्धेत 185 विद्यार्थ्यांचा सहभाग

“देऋब्रा” च्या पाठांतर स्पर्धेत 185 विद्यार्थ्यांचा सहभाग

सोलापूर (प्रतिनिधी.) .ः येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्यावतीने दासनवमीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक, करूणाष्टके व रामरक्षा यावर आधारीत पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शहरातील सुमारे 185 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सरस्वती मंदीर शाळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उदघाटन कल्याण (मुंबई) येथील गीता मंडळाच्या उपासक राजश्री देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर, कार्यवाह श्याम जोशी, उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, खजिनदार सतीश पाटील, कार्यकारिणी सदस्य शंकर कुलकर्णी, रविंद्र तुळजापूरकर, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी आदींसह पालक व विविध शाळेतील शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतून छोटा गट ते चौथी इयत्तेतील सुमारे 185 विद्यार्थी सहभागी झाले होते.

शुभदा कुलकर्णी , मीरा धामणगावकर, अमरजा वासकर, अपर्णा तुळजापूरकर, योजनगंधा जोशी, पद्मजा तारके, स्मिता देशपांडे, मानसी कुलकर्णी, सुवर्णा देशपांडे, शांभवी कणबसकर, दामोदर कुलकर्णी यांनी परिक्षकाचे काम केले. स्पर्धेचा निकाल त्या त्या शाळेत जाहीर करण्यात आला आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रम बुधवारी (ता.6) सायंकाळी सहा वाजता दत्त चौकातील रामदास संकुलातील संस्था कार्यालयात होणार आहे. यावेळी बक्षिसासह सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR