22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर२ कारची टक्कर, ७ ठार ३ गंभीर, जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

२ कारची टक्कर, ७ ठार ३ गंभीर, जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

जालना : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागपूरहून मुंबईकडे जाणा-या कारला राँग साईडने येणा-या कारची धडक बसल्याने हा अपघात झाला.

जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात ७ ठार तर ३ जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास नागपूरवरून मुंबईकडे जाणारी आर्टिका आणि राँग साईडने येणा-या स्विफ्ट डिझायरची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रस्त्यालगत पडलेल्या आर्टिका गाडीला क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले. अपघातातील गंभीर जखमींपैकी तिघांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगरकडे रेफर करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

मृतांमध्ये फय्याज शकील मंसुरी, फैजल शकील मंसुरी, अल्थमेश मंसुरी (सर्व रा. मालाड, मुंबई पूर्व, आर्टिका कार क्र. एमएच ४७ आरपी ५४७८), प्रदीप लक्ष्मण मिसाळ (३८, रा. पिंपळगाव, ता. देऊळगाव राजा), संदीप माणिकराव बुधवंत (३०, कार चालक), विलास सुदान कायंदे (२८, रा. उरकीड, ता. देऊळगाव राजा,स्वीफ्ट कारमधील व्यक्ती) यांच्यासह ७ जणांचा समावेश आहे.

दोन्ही गाड्यांचा चक्काचूर
अपघातग्रस्त आर्टिका गाडी नागपूरवरून मुंबईला जात होती. या गाडीची राँग साईडने येणा-या स्विफ्ट डिझायर गाडीला जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या ४ ते ५ फूट खाली कोसळली. यात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR