30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रकार नाल्यात कोसळून २ ठार

कार नाल्यात कोसळून २ ठार

धुळे : संपूर्ण देशभरात नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत होत आहे. एकीकडे नववर्षाचा माहोल असताना दुसरीकडे मात्र शिरपूर येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिरपूर येथील चोपडा रस्त्यालगत जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळली आणि कारमधील दोन जण ठार झाले. प्रवीण शिवाजीराव पाटील (रा. क्रांतीनगर) व प्रशांत राजेंद्र भदाणे असे मयत युवकांचे नाव आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री शिरपूर-चोपडा रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणीच्या मागील परिसरातून हॅरियर कारने (क्र. एमएच १८, बीएक्स १९२०) प्रवास करणा-या चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार नाल्यात जाऊन कोसळली. कारचा वेग जास्त असल्याने कारमधील प्रवीण पाटील व प्रशांत भदाणे जागीच ठार झाले. अपघातानंतर रात्रभर कार व मृतदेह घटनास्थळीच पडून होते. दोघांच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहाटे तेथून ये जा करणा-या लोकांना कारच्या अपघाताबाबत माहिती मिळाली.

एक हॉटेल व्यावसायिक तर एक कॉन्ट्रॅक्टर
मृतदेहाची ओळख पटल्यावर त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही युवक विवाहित असल्याचे कळते. प्रवीण पाटील हॉटेल व्यवसायिक होते तर प्रशांत भदाणे यांनी अल्पावधीतच कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR