26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी बसच्या भीषण धडकेत २ ठार

एसटी बसच्या भीषण धडकेत २ ठार

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये, २ जण ठार झाले असून १५ हून अधिक प्रवासी जखमी आहेत. जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला.

या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एसटी बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस व प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. अपघातातील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात झालेली एसटी बस पारनेरवरुन मुंबईकडे तर, कार आळेफाट्याकडे जात असताना ओतुरजवळ हा अपघात झाला.

बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा आणि ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांत वाढ झालेली दिसून येत आहे. अपघाताच्या बातम्या कमी होताना दिसत नाही, याउलट विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्याचेच वृत्त झळकत आहे. त्यामध्ये, प्रवाशांची लाडकी असलेल्या लालपरीचाही नंबर दिसून येतो. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन लालपरी रस्त्यावर धावते. मात्र, गेल्या काही दिवसांत एसटी बसच्या अपघातांच्या घटना घडत आहेत. अनेकदा बसची झालेली दूरवस्थाच या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्रवाशांकडून व चालकांकडून सांगण्यात येत असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR