22.4 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeपरभणीराज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत २०० खेळाडूंचा सहभाग

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत २०० खेळाडूंचा सहभाग

परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा १४ वर्षाखालील मुले/मुली स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेकरिता राज्यातील जवळपास २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धा दि. २० ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, परभणी येथे आयोजित केल्या आहेत. पहिल्या दिवशी १४ वर्षाखालील मुले तर दुस-या दिवशी १४ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव, परभणी जिल्हा कुस्ती असोसिएशन परभणी सचिव डॉ प्रा. माधव शेजुळ, राजे संभाजी तालीम केंद्र संचालक अण्णा डिगोळे, शरद कचरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांची उपस्थिती होती. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कार्यालयातील क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर, क्रीडा मार्गदर्शक कल्याण पोले, वरिष्ठ लिपीक रमेश खुणे, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे आणि प्रकाश पंडित यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR