नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी १८ प्रशिक्षण शिबिरे आणि ३७ लाँच पॅड सक्रिय केले आहेत, ज्यामध्ये २०० दहशतवादी संधी मिळताच भारतात घुसखोरी करण्याचा विचार करत आहेत, अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. हे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे अल बद्र, जैश, लष्कर आणि हिजबुल मुजाहिद्दीन चालवत आहेत. दहशतवादी संघटनेने हाजी पीर सेक्टर, फॉरवर्ड कहुटा, पध मोहल्ला, रंकडी, सीधियान, कोटली, लीला व्हॅली, नीलम व्हॅली, पीओकेच्या कोटलीमध्ये लॉन्च पॅड बनवल्याचीही माहिती समोर आली आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना जंगलात युद्ध आणि क्लोज कॉम्बॅट मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. सीमेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांमध्ये दहशतवाद्यांनी तळ ठोकला असून तेथून त्यांनी भारतात घुसखोरी करण्याची तयारी केली आहे. सीमेपलीकडून भारतीय हद्दीत मोठ्या हल्ल्यांची योजना आखली जात आहे. छावण्यांमध्ये दहशतवाद्यांची फौजही तयार केली जात आहे. पाक लष्कराचे अधिकारी आणि दहशतवादी संघटनांचे नेते वेळोवेळी या छावण्यांना भेट देत असून तरुणांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणावर लक्ष ठेवत आहेत.