25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeअंतरराष्ट्रीयदक्षिण कोरियात बॅटरी फॅक्टरी जळून २२ जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियात बॅटरी फॅक्टरी जळून २२ जणांचा मृत्यू

सेऊल : दक्षिण कोरियामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लिथिअम आयन बॅटरी बनविणा-या फॅक्टरीला भीषण आग लागल्याने २२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे दहाला ही आग लागली.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये ही फॅक्टरी आहे. दक्षिण कोरियाची प्रमुख बॅटरी निर्माता कंपनी एरीसेल या कंपनीच्या फॅक्टरीला आग लागली आहे. लिथिअम आयनने पेट घेतल्याने राखाडी रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे अग्निशमन दल आतमध्ये जाण्यास असमर्थ होते.

अजूनही आत जाऊन बचाव कार्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आग आटोक्यात आल्यावर आम्ही प्रयत्न करू असे अग्निशमन दलाचे जवान किम जिन-यंग यांनी सांगितले. कंपनीत किती कामगार होते याची माहिती मिळू शकलेली नाही. कंपनीने दिलेल्या लिस्टनुसार त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. गोदामातील बॅटरी सेलचा स्फोट झाला आणि ही आग पूर्ण कंपनीत पसरली. या ठिकाणी जवळपास ३५ हजार बॅटरी युनिट होत्या. या सर्व बॅटरी जळाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR