28.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटकात तब्बल २२ हजार कोटींचा प्रकल्प

कर्नाटकात तब्बल २२ हजार कोटींचा प्रकल्प

फॉक्सकॉन ४० हजार थेट नोक-या देणार

बंगळूर : तैवानी उत्पादक ‘फॉक्सकॉन’ने कर्नाटकमध्ये २२ हजार कोटींचा प्रकल्प दोड्डबळ्ळापूरजवळ उभारला आहे. त्यातून राज्यात ४० हजार थेट नोक-या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ‘फॉक्सकॉन’चे प्रमुख यंग लिऊ यांनी सांगितले की, कर्नाटकातील युनिट, चीनच्या युनिटनंतर फॉक्सकॉनचा दुुसरा सर्वात मोठा प्लांट बनण्याची अपेक्षा आहे.

लिऊ म्हणाले, विशेषत: मध्यमवर्गीय शिक्षित व्यक्तींसाठी संधी आहे. आमची गुंतवणूक इथेच थांबणार नाही. परस्पर विश्वास असल्यास काहीही साध्य होऊ शकते. ‘फॉक्सकॉन’ला आम्ही पाणी, वीज आणि रस्त्यांपासून कायदेशीर मदतीपर्यंत सर्व काही देऊ असे लिऊ यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

बंगळूर प्लांट अ‍ॅपल गॅझेट्स तयार करेल. कंपनीने कर्नाटक सरकारसह राज्यात ५०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करण्यासाठी करार पत्रावर स्वाक्षरी केली होती. गुंतवणूक २०२३ ते २०२७ दरम्यान केली जाईल आणि या प्रकल्पात सुमारे एक लाख लोकांना रोजगार मिळेल. उद्योगमंत्री एम. बी. पाटील म्हणाले, फॉक्सकॉनच्या प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केआयएडीबी, केपीटीसीएल, अग्निशमन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR