22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयदेशात मिळणार २४ तास वीज!

देशात मिळणार २४ तास वीज!

३.३७ लाख मेगावॉटने वीज निर्मिती वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात २४ तास सुरळित वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागात वीजवितरण व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत २०३२ पर्यंत ३.३७ लाख मेगावॉटने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिली.

केंद्र सरकारने देशात सुरळित वीजपुरवठा करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जाविकास योजना आणि प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेच्या माध्यमातून १.८५ लाख कोटी खर्च करण्यात आले. त्यातून १८,३७४ खेड्यांचे विद्युतीकरण, तर २.८६ कोटी घरांपर्यंत वीज पोहोचविण्यात आली. त्यानंतर आता देशभरात २४७ विनाअडथळा वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडून वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यावर भर दिली जात आहे.

राज्याला अखंड वीज पुरवठा व्हावा, म्हणून महानिर्मिती १५ हजार कोटी रूपये खर्चून तीन हजार मेगावॉटचे औष्णिक वीज प्रकल्प उभारणार आहे. सध्या देशात अक्षय ऊर्जानिर्मितीवर भर दिला आहे. त्यामुळे ग्रीडची फ्रिक्वेन्सी राखण्यासाठी औष्णिक वीज आणि जलविद्युत निर्मिती क्षमता तुलनेने कमी दिसत आहे. त्यामुळे केंद्राने देशात ८० हजार मेगावॉट क्षमतेचे औष्णिक प्रकल्प उभारण्याचे निर्देश राज्यांना दिले. त्यानुसार महानिर्मिती कोराडी वीज केंद्रात ६६० मेगावॉटचे दोन संच, तर उर्वरित १६८० मेगावॉटचा प्रकल्प उभारण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

या वीज प्रकल्पासाठी जवळपास १५ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. सदरचा निधी रूरल इलेक्ट्रिफिकेशन कार्पोरेशन आणि पॉवर फायनान्स कार्पोरेशनकडून कर्जरुपाने उभा केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR