23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeपरभणीयेलदरी जलाशयात २६.९४ टक्के पाणीसाठा

येलदरी जलाशयात २६.९४ टक्के पाणीसाठा

परभणी : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात २६.९४ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा, ८०९.७७० दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा व ९३४.४४० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणीसाठ्याची क्षमता आहे.

त्या तूलनेत शुक्रवारी (दि.१४) सकाळी ८ वाजेपर्यंत या जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा २१८.१७० जिवंत पाणीसाठा तर ३४२.८४० एवढा एकूण साठा उपलब्ध आहे. जलाशयातील पाणी पातळी ४५४.०७० मीटर एवढी असून मागील २४ तासात या जलाशयात ०.२०७ दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली. जलाशयात २६.९४ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिक-यांनी दिली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR