21.2 C
Latur
Sunday, December 29, 2024
Homeराष्ट्रीय२७ औषधांचे नमुने निकामी

२७ औषधांचे नमुने निकामी

हृदय-बीपी, अ‍ॅलर्जी, किडनीशी संबंधित औषधांचा समावेश हिमाचलच्या १३ कंपन्यांना नोटीस

नालागड : हिमाचल प्रदेशमध्ये उत्पादित २७ औषधांचे नमुने निकामी आढळले आहेत. ही औषधे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या मानकांची पूर्तता करत नाहीत. याबाबत सीडीएससीओने ड्रग अलर्ट जारी केला आहे. राज्य औषध नियंत्रकाने या उद्योगांना नोटिसाही बजावल्या आहेत. नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

हिमाचलमधून बनवलेल्या औषधांचा देशभरात पुरवठा केला जातो. सॅम्पल फेल झाल्यानंतर औषध नियंत्रकांनी या फार्मा कंपन्यांना औषधांचा साठा परत मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून मानकांमध्ये न बसणारी ही औषधे लोकांपर्यंत पोहोचू नयेत. नोव्हेंबर महिन्यात देशात एकूण १११ औषधांचे नमुने निकामी झाले आहेत. त्यापैकी २७ औषधे हिमाचलमध्ये बनतात. ज्यांचे नमुने अयशस्वी झाले आहेत.

त्यापैकी बहुतेक औषधांचा वापर हृदयविकार, उच्च रक्तदाब, वेदना, प्रतिजैविक आणि अ‍ॅलर्जीसह इतर आजारांच्या उपचारात केला जातो. सीडीएससीओच्या मते, बहुतेक औषधे हृदय, बीपी, अँटीबायोटिक्स, किडनी आणि अ‍ॅलर्जी यांसारख्या आजारांशी संबंधित आहेत. यापैकी बहुतेक औषधे बड्डी बरोतीवाला आणि नालागड (बीबीएन) मध्ये बनविली जातात. सोलन आणि कलाअंब उद्योगातील औषधेही निकामी झाली आहेत.

विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्हे
हिमाचलच्या १६ औषधांचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत आणि ११ राज्य प्रयोगशाळेत निकामी आढळले. बीबीएनच्या मार्टिन अँड ब्राउन कंपनीच्या तीन औषधांचे नमुने निकामी झाले आहेत. या वर्षीही या कंपनीच्या चार औषधांचे नमुने निकामी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा स्थितीत विभागाच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

नियमानुसार कारवाई करणार : औषध नियंत्रक
राज्य औषध नियंत्रक मनीष कपूर यांनी सांगितले की, ज्या उद्योगांच्या औषधांचे नमुने निकामी आढळले आहेत. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल. याआधी सर्व औषध कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR