वायझॅक : भारतीय संघाने दुस-या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून हार पत्करावी लागल्याने भारतीय संघ पुनरागमनासाठी सज्ज आहे. रवींद्र जडेजा व लोकेश राहुल यांनी दुखापतीमुळे दुस-या कसोटीतून माघार घेतल्याने कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता होती. सर्फराज खान आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाचे आज पदार्पण होईल हे निश्चित होते. अनेकांच्या मते सर्फराजला संधी दिली जाईल असे वाटलेले, परंतु रजतला पदार्पणाची संधी दिली गेली. शिवाय भारतीय संघ आज ३ बदलांसह मैदानावर उतरला आहे.
टॉस जिंकल्यावर रोहित शर्मा म्हणाला, आम्ही प्रथम फलंदाजी करू. चांगली खेळपट्टी दिसते, खेळपट्टी आपले काम करेल, आपल्याला चांगले क्रिकेट खेळायला हवे. हैदराबादमध्ये जे घडले ते इतिहास आहे, आपण पुढे जायला हवे. आम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यावर आम्ही बोललो आहोत, आता आम्हाला आमच्या योजना अंमलात आणण्याची गरज आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन बदल आहेत. मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदार खेळणार आहेत.
भारतीय संघ
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव