24.6 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeसोलापूरअज्ञात वाहनाच्या धडकेत ३ ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ ठार

टेंभूर्णी : प्रतिनिधी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिराळ (टें) हद्दीत पुण्याहून येणा-या अज्ञात वाहनाने मोटारसायकल स्वारास पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये मोटार सायकलवरील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना २३ मे रोजी (गुरुवार) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेल जय मल्हारच्या समोर घडली आहे.

या अपघातातील मृत तिघेजण मोहोळ तालुक्यातील असून यात मावस बहीण-भाऊ व जावेचा समावेश आहे. या अपघाताने तीन कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. महादेव रमेश ताकमोगे (वय २२, रा. देगांव, ता. मोहोळ) सध्या रा. टेंभुर्णी, एमआयडीसी, महानंदा विकास पवार (वय ४५) सुषमा प्रकाश पवार (वय ४०) दोघी रा. देगांव ता. मोहोळ अशी मृतांची नावे आहेत. सदर दुचाकीचालक शिराळ (टें) हद्दीतील हॉटेल जयमल्हारच्या समोर आले असता त्यांना पुण्याहून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात महादेव रमेश ताकमोगे व सुषमा पवार हे दोघे जागीच ठार झाले तर महानंदा यांना टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताविषयी फिर्याद महादेव दत्तात्रय जाधव (३८) रा. एकरुके ता. मोहोळ यांनी दिली आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR