28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रविसर्जनावेळी ३ जण बुडाले

विसर्जनावेळी ३ जण बुडाले

सांगलीत घटना, २ जण बचावले, १ बेपत्ता

सांगली : सांगलीत दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना मोठी दुर्घटना घडली. कृष्णा नदीत मूर्तीचे विसर्जन करताना तीन जण बुडाले. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकजण अद्याप बेपत्ता आहे. शनिवारी रात्री अंधारामुळे बेपत्ता असलेल्या तरुणाची थांबवण्यात आलेली शोध मोहीम आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरज अर्जुनवाड घाट येथे दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी काही तरुण नदीपात्रात उतरले होते. यावेळी तीन तरुण बुडत असताना आयुष हेल्पलाईन आपत्कालीन पथकाचे सदस्य योगेश आनंदे यांनी तात्काळ पाण्यात उतरून लक्ष्मण मोरे (वय ४५) अमोल गायकवाड (वय १७, रा. सुभाषनगर) या दोघा तरुणांना वाचवले.

मात्र, तिसरा तरुण अमित गायकवाड (वय १८, रा. सुभाषनगर) बुडत असल्याचे लवकर लक्षात आले नाही, असे आनंदे यांनी सांगितले. दरम्यान, अमित गायकवाड बुडाल्याचे कळताच नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. रात्री अंधार असल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती, ती आज सकाळी परत सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR