22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरट्रकला आग लागल्याने ३० शेळया होरपळल्या

ट्रकला आग लागल्याने ३० शेळया होरपळल्या

बीड : बीड जिल्ह्यातून जाणा-या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाडळसिंगी परिसरात २०० शेळ्या घेऊन जाणा-या ट्रकला अचानक लागलेल्या आगीत ३० शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या ट्रकमधील १७० शेळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिस व स्थानिकांना यश आले. मात्र, या शेळ्यांना सुखरुप बाहेर काढताना महामार्गावरील पोलिस कर्मचारी, हवालदार अन्सार मोमीन हे किरकोळ जखमी झाले आहेत.

राजस्थानकडून २०० शेळ्या घेऊन हैदराबादकडे निघालेला ट्रकच्या डिझेल टाकीजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली होती. ट्रकचालकास याबाबत समजताच त्याने तात्काळ ट्रक थांबवून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण ट्रकला भीषण आग लागली, आगीत ट्रक पेटल्याने सगळीकडे हाहाकार उडाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, या ट्रकमध्ये असलेल्या शेळ्या बाहेर काढण्यासाठी सर्वांची जीवाची बाजी लावली. आग लागलेल्या ट्रकमधून शेळ्यांना सुखरुपणे बाहेर काढताना या सर्वांची दमछाक झाली. मात्र, तब्बल १७० शेळ्यांना घेऊन सुखरुप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, या ट्रकमधून तब्बल २०० शेळ्या हैदराबादला नेण्यात येत होत्या. ट्रकला आग लागल्यानंतर शेळ्यांचा जीव वाचवताना या बचाव कार्यामध्ये पोलिस हवालदार अन्सार मोमीन किरकोळ जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR