नवी दिल्ली : यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना ३१ जवान शहीद झाले आहेत. यापैकी ३ जवान गस्ती मोहिमेदरम्यान शहीद झाले, तर जम्मू-काश्मीरच्या विविध भागात झालेल्या चकमकीत २८ जवान शाहिद झाले. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक चकमकी झाल्या, मात्र अशा नऊ चकमकी झाल्या, ज्यात आपले जवान शहिद झाले. यातील ६ चकमकी जम्मू विभागात तर ३ काश्मीर खोऱ्यात झाल्या. यावर्षी जम्मूच्या पुंछ आणि राजौरीमध्ये झालेल्या चकमकीत २१ जवान शहीद झाले आहेत. तर खोऱ्यातील कारवाईदरम्यान ७ जवानांना प्राण गमवावे लागले.
यावर्षी मार्च, जून, जुलै आणि ऑक्टोबरमध्ये एकाही सैनिकाला जीव गमवावा लागला नाही. फेब्रुवारीमध्ये एक जवान शहीद झाला होता. त्याच वेळी एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी ५ जवान शहीद झाले. याशिवाय सप्टेंबरमध्ये चार आणि ऑगस्टमध्ये तीन जवान शहीद झाले होते. त्याच वेळी, या वर्षी जानेवारीमध्ये, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे नियमित ऑपरेशन दरम्यान, खोल खंदकात पडून एक जेसीओ आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाला.