22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमेफेड्रोन निर्मितीस लागणारा ३४० किलो कच्चा माल जप्त

मेफेड्रोन निर्मितीस लागणारा ३४० किलो कच्चा माल जप्त

पुणे : मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारा ३४० किलो कच्चा माल गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. २) जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ, सांगली परिसरात छापे टाकून तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. या गुन्ह्याची चौकशी करीत असताना कच्चा मालाबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीने कच्चा माल विश्रांतवाडीत एका टेम्पोत लपवून ठेवल्याचे तपासात उघडकीस आले होते. जप्त करण्यात आलेल्या कच्च्यामालात रासायनिक पदार्थांचा समावेश आहे. त्याचा वापर मेफेड्रोन आणि मेथ असे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात. जप्त करण्यात आलेला कच्चा माल तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवून देण्यात येणार आहे. तपासणीनंतर कच्च्या मालातील रासायनिक पदार्थांची माहिती मिळणार आहे अशी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

मेफेड्रोन तस्करी देश-परदेशात करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात मेफेड्रोन तयार केले जात होते. तेथे छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून मेफेड्रोन तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया परदेशात पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मेफेड्रोन विक्री प्रकरणात एका हॉटेल कामगाराला शुक्रवारी (ता. १) अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणात पिंपरीतील सहायक निरीक्षक विकास शेळके सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

खोकल्याच्या औषधासाठीच्या रसायनांचा वापर
खोकल्याचे औषध (कफ सिरप) निर्मितीसाठी ज्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो, त्याच पदार्थांचा वापर मेफेड्रोन, मेथ असे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR