22.6 C
Latur
Saturday, July 20, 2024
Homeराष्ट्रीयबोगदा कोसळल्याने ३६ मजूर अडकले

बोगदा कोसळल्याने ३६ मजूर अडकले

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी एक बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला. ढिगा-याखाली सुमारे ३६ कामगार अडकले आहेत. ब्रह्मकमळ आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगावदरम्यान हा बोगदा बांधला जात आहे. सध्या बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाठवला जात आहे.

रविवारी पहाटे चार वाजता हा अपघात झाला. हा बोगदा ४ किमी लांबीचा आहे. बांधकामाधीन बोगद्याचा १५० मीटरचा भाग कोसळला. अधिका-यांच्या सध्याच्या अंदाजानुसार कामगारांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. ढिगारा काढण्यासाठी ड्रिलिंग मशीनची व्यवस्था केली जात आहे. बोगदा कोसळल्याची माहिती मिळताच उत्तरकाशीचे एसपी अर्पण यदुवंशी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. ठऊफऋ, रऊफऋ, अग्निशमन दल, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. हा सर्व हवामान बोगदा चार धाम रोड प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. त्याच्या बांधकामानंतर, उत्तरकाशी ते यमुनोत्री धाममधील अंतर २६ किमीने कमी होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR