22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिक येथे पिकअप-आयशरच्या धडकेत ६ ठार

नाशिक येथे पिकअप-आयशरच्या धडकेत ६ ठार

मृतक देवदर्शनाहून परतत असलेले कामगार

नाशिक : नाशकातील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनाहून परतत असलेल्या ६ कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची दिली माहिती डॉक्टरांनी आहे. निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकची माहिती अशी की, नाशकातील मुंबई -आग्रा महामार्गावर पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला. लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली. या अपघातातील जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त असल्याची माहिती असून पोलिसांकडून त्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्तांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस अपघाताची चौकशी करत आहेत.

वाहतूक विस्कळीत
नाशिक मुंबई अग्रा महामार्गावरील भीषण अपघातानंतर नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. उड्डाण पुलावर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR