सोलापूर : जोडभावी पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चार मोटारसायकली जप्त करून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जोडभावी पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांनी दिली. नागेश भीमाशंकर पाटील(३७, रा. चनशेट्टी अपार्टमेंटसमोर घोंगडेवस्तती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने जोडभावी पोलिस ठाणे येथील हद्दीत पेट्रोलिंग करीत मार्केट यार्डसमोर आले असता गुन्हे पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या महितीनुसार एक इसम दहिटणे रोडलगत झाडाझुडपात चार मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून कोणीतरी वाट पाहत थांबलेला आहे. यावेळी पथकाने सापळा रचून नागेश पाटील यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की चोरी केलेल्या चार मोटारसायकल झाडाझुडपात लपवल्याचे सांगितले. त्याच्याकडून चार मोटारसायकल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कवाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, शबनम शेख, खाजप्पा आरेनवरू, शितल शिवशरण, अभिजित पवार यांनी पार पाडली.