22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीयझारखंडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार

झारखंडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार

नवी दिल्ली : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील गुवा पोलिस स्टेशन हद्दीतील कोल्हानच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. चकमकीच्या ठिकाणाहून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहीम सुरू केली असता. लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना जवानांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले.

सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू असून काही नक्षलवाद्यांना गोळ्या लागल्याचीही माहिती आहे.पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी या चकमकीला दुजोरा दिला. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की, सकाळी शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR