परभणी : देशभरात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन सामाजिक, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेवून साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्रच्या वतीनेही शहरातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या ४० व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते संविधान गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजी. आर.डी. मगर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते सत्तार इनामदार, अॅड. निलेश करमुडी, शिवाजी चव्हाण, रेणुका बोरा, खदीरलाला हाश्मी, प्रमोद कुटे, आदिंची उपस्थिती होती. महाराष्ट्रभरात सामाजिक, शैक्षिणक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ४० महिला व पुरुषांचा संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते. सूत्रसंचलन प्रा. राजकुमार मनवर यांनी तर आभार प्रदर्शन शेख सरफराज यांनी केले.