24.4 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeराष्ट्रीयबनावट प्रमाणपत्रावर ४१ वर्षे पोलीस सेवा

बनावट प्रमाणपत्रावर ४१ वर्षे पोलीस सेवा

इंदूर : पोलीस विभागालाच फसवणूक तब्बल ४२ वर्षे नोकरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील आहे. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे गेल्या ४१ वर्षांपासून येथे एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. पोलीस खात्यात रुजू होऊन २३ वर्षांनंतर आरोपी हवालदाराविरुद्ध बनावट जात प्रमाणपत्राबाबत तक्रार प्राप्त झाली. अशा प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना अनेक वर्षे लागली.

याबाबत न्यायालयीन कामकाजासाठी १२ वर्षे लागली. अशाप्रकारे ४१ वर्षांनंतर आरोपी हवालदाराने पोलिस खात्याची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, त्यांच्या निवृत्तीच्या अवघ्या २ वर्ष आधी. चार हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. वर्ष २००६ मध्ये, आरोपी कॉन्स्टेबल सत्यनारायण वैष्णव विरुद्ध इंदूरच्या छोटी ग्वालटोली पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने तो बनावट जात प्रमाणपत्रावर काम करत असल्याचे दोषी आढळले. पोलीस तपास समितीने १८ डिसेंबर २०१३ रोजी न्यायालयात चलन सादर केले होते. यानंतर न्यायालयात खटला चालला. आता या प्रकरणाचा निर्णय २०२४ मध्ये आला आहे.

जिल्हा सार्वजनिक अभियोक्ता अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप सिंग यांनी दोन कलमांतर्गत १० वर्षे आणि इतर दोन कलमांतर्गत प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपी कॉन्स्टेबल सत्यनारायण वैष्णव याला कोर्टाने चार हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR