हैदराबाद : आंध्र प्रदेशातील मुम्मीदिवरम मतदारसंघातील वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार पोनडा वेंकट सतीश कुमार यांच्या पाच नातेवाईकांचा अमेरिकेतील टेक्सास येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. २६ डिसेंबर रोजी हा अपघात झाला. मारले गेलेले लोक दुसऱ्या नातेवाईकाच्या घरी गेले होते आणि सकाळी प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना त्यांच्या वाहनाला पिकअप ट्रकने धडक दिली.
पिकअप चुकीच्या दिशेने जात असल्याचे प्राथमिक अहवालात दिसून आले आहे. या घटनेत एक जण लोकेश चमत्कारिकरित्या बचावला. आमदारांचे काका पी नागेश्वर राव, सीता महालक्ष्मी, नवीना, कृतिक आणि निशिता अशी मृतांची नावे आहेत. अन्य सदस्याच्या नावाची माहिती मिळालेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जखमींना विमानाने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. घटनेची माहिती देताना आमदार सतीश कुमार म्हणाले की, माझे काका नातेवाईकाच्या घरी ख्रिसमस साजरा करत होते. २६ डिसेंबर रोजी ते सकाळी प्राणीसंग्रहालयात गेले आणि दुपारी ४ वाजता (स्थानिक वेळेनुसार) परतले. त्याच्या कारला ट्रकने धडक दिली, ट्रकची चूक असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.