मुंबई : इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी गुरुवारी सांगितले की भारत गुप्त माहिती गोळा करण्यासाठी पुढील पाच वर्षांत ५० उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत स्थापित केले जातील आणि हजारो किलोमीटरच्या परिघात लष्करी हालचाली आणि छायाचित्रे टिपण्याची यात क्षमता असेल. आयआयटी बॉम्बे तर्फे आयोजित वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम टेकफेस्ट दरम्यान, ते म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) डेटा विश्लेषणाची क्षमता वाढवण्यासाठी बदल शोधू शकणारे उपग्रह असणे महत्वाचे आहे. हे उपग्रह देशाच्या सीमावर्ती भाग आणि शेजारील भागांवर लक्ष ठेवण्यास सक्षम असतील.