35.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रबीएड कॉलेजच्या ५०० कर्मचा-यांची उपासमार

बीएड कॉलेजच्या ५०० कर्मचा-यांची उपासमार

यवतमाळ : २००१ पूर्वीच्या बी.एड. महाविद्यालयांना अनुदान नसल्याने राज्यातील ८९ महाविद्यालयांतील ५०० कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व महाविद्यालयांना तत्काळ अनुदान देऊन सर्व कर्मचा-यांना दिलासा द्यावा, असे साकडे विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनने उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे घातले आहे.

२४ नोव्हेंबर २००१ नंतर सरकारने विनाअनुदानित धोरण स्वीकारले. तत्पूर्वीची सर्व महाविद्यालये अनुदानास पात्र आहेत. याच धोरणानुसार राज्यात २००१ पूर्वीची कला, विज्ञान व वाणिज्य शाखांची वरिष्ठ महाविद्यालये अनुदानित झाली आहेत.

२००१ पूर्वी स्थापित झालेली ८९ शिक्षणशास्त्र महाविद्यालये अनुदानास पात्र आहेत. सद्यस्थितीत या महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालये बंद झाली आहेत. सुमारे ८० महाविद्यालये चालू असून, त्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR