29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रअलिबागमध्ये रस्त्यावर ५०० च्या नोटा; सर्वत्र खळबळ

अलिबागमध्ये रस्त्यावर ५०० च्या नोटा; सर्वत्र खळबळ

अलिबाग : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या काळात व दिवाळीच्या ऐन सणात अलिबाग शहराच्या जवळ गोंधळपाडा येथील अंतर्गत रस्त्यावर ५०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. या नोटा मार्गावरून येणा-या, जाणा-या वाहनचालक, वाटसरूंनी उचलून नेल्याची जोरदार चर्चा आहे. पोलिसांत मात्र याबाबत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत प्रत्यक्षदर्शी सोगावकर यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, बुधवारी (३० ऑक्टोबर) रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ते गोंधळपाडा येथील अंतर्गत रस्त्याने बुरुमखाणकडे जात असताना भररस्त्यात होमगार्डच्या पुढील वळणावर वाहनचालक व इतर चालत जाणा-यांची गर्दी जमली होती.

यावेळी एखादा अपघात झाला असेल म्हणून ते थांबून चौकशी केली असता एका आरसीएफ कामगार असलेल्या दुचाकी स्वाराने सांगितले की, अज्ञात व्यक्तीच्या ५०० रुपयांच्या नोटा पडल्या आहेत, त्या गोळा करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR