नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ५२९ नवीन रुग्ण आढळून आले असून उपचाराधीन रूग्णांची संख्या ४,०९३ इतकी नोंदवली गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५२९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोविड-१९ मुळे कर्नाटकात दोन आणि गुजरातमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
अलिकडच्या काळात थंडी आणि कोरोना विषाणूच्या उपप्रकारामुळे संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी, ५ डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती. २०२० च्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास चार वर्षांत देशभरात ४.५ कोटींहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि त्यामुळे ५.३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४.४ कोटी झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर ९८.८१ टक्के असून मृत्यू दर १.१९ टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.