31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयपश्चिम बंगालमध्ये ६ आमदार निलंबित

पश्चिम बंगालमध्ये ६ आमदार निलंबित

कोलकाता : संदेशखाली मुद्यावरून ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध आंदोलन करणा-या आणि सभागृहात गोंधळ घालणा-या भाजपच्या सहा आमदारांना आज निलंबित करण्यात आले. यात विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी, अग्निमित्र पाल, शंकर घोष, तापसी मंडल, बंकिम घोष आणि मिहीर गोस्वामी यांचा समावेश आहे. या सहा जणांवर उर्वरित अधिवेशनाचा कालावधी किंवा ३० दिवसांसाठी त्यापैकी जे अगोदर लागू होईल, त्यानुसार होईल.

विधानसभेत आमदारांचे वर्तन बेशिस्त आणि गोंधळाचे असल्याने निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. राज्य विधानसभा नियम ३४८ नुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा प्रस्ताव पश्­िचम बंगालचे संसदीय कामकाज मंत्री सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी मांडला. यावेळी निलंबनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR