27.3 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeसोलापूरपंढरपूर-कराड रोडवर भीषण अपघातात ७ महिला जागीच ठार

पंढरपूर-कराड रोडवर भीषण अपघातात ७ महिला जागीच ठार

सोलापूर : भरधाव वेगाने जाणा-या १४ चाकी ट्रकने रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना उडवले. या अपघातात ७ महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा भीषण अपघात मंगळवार दि. १८ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-कराड रोडवरील चिकमहुद जवळ ( बंडगरवाडी )पाटी येथे घडला.

मृत व जखमी महिला कटफळ (ता. सांगोला) येथील रहिवासी आहेत. सात महिला मिळून मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतक-यांच्या शेतावर आल्या होत्या. दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर-कराड रोडवरील (बंडगरवाडी) पाटी रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या असता पंढरपूरकडून भरधाव जाणा-या ट्रकने त्यांना उडविल्याने हा भीषण अपघात घडला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR