सेलू : कै. श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त नूतन विद्यालयातील चित्रकला विभागाच्या वतीने गत १७ वर्षांपासून चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी इयत्ता १ली ते ४थी, ५वी ते ७स्वी आणि ८ वी ते १० वी या तीन गटातील स्पर्धेसाठी शहरातील ६००च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पहिली ते चौथी गटासाठी प्राण्यांची ओळख होण्याच्या निमित्ताने त्यांना प्राण्यांची रेखाटलेले चित्र देण्यात आले. तर पाचवी ते सातवी गटासाठी पतंग उडवणारी विद्यार्थी रेखाटलेले चित्र देण्यात आले. आठवी ते दहावी गटासाठी चित्रकला स्पधेर्तील विषय मी आणि माझी सुंदर शाळा, माझा आवडता खेळ, भारतीय सैनिक एक प्रसंग या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने चित्रे साकारली.
यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस एम लोया, चिटणीस डॉ. विनायकराव कोठेकर, सहचिटणीस उद्योजक जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील, प्राचार्य नरेंद्र पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजक चित्रकला विभाग प्रमुख आर.डी.कटारे, फुलसिंग गावित, बाबासाहेब हेलसकर, भगवान देवकते, बाळू बुधवंत, सुनील तोडकर, अश्विनी पटाईत, आदीती अंबेकर, प्रतिज्ञा चव्हाण, संध्या फुलपगार, बाबासाहेब गोरे, बाळू बुधवंत, नरेंद्र पाटील, प्रणिता सोलापूरे, बेदरकर, सौ. पदमावत, व्यास, दळवी, चिटणीस, किर्ती राऊत, कुंभार, बिरादार, भांबळे, सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी, खाटीकमारे, पांडुरंग पाटणकर, बी विजेंद्र धापसे, केशव डहाळे, अरुण रामपूरकर, गोरखनाथ घायाळ, रामेश्वर पवार आदींनी सहकार्य केले.