17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीय७ लाख परदेशी विद्यार्थ्यांना आता कॅनडा सोडावा लागणार

७ लाख परदेशी विद्यार्थ्यांना आता कॅनडा सोडावा लागणार

टोरॅँटो : वृत्तसंस्था
कॅनडात शिकणा-या परदेशी विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटाच्या भोव-यात सापडले आहे. सुमारे ७ लाख परदेशी विद्यार्थी आहेत, ज्यांना पुढील वर्षी कॅनडा सोडावे लागू शकते. यामुळे कॅनडामध्ये वर्क परमिटची मुदत संपलेल्या विद्यार्थी च्ािंतेत आहेत.

ट्रुडो सरकारच्या एका निर्णयामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. ट्रुडो स्थलांतरितांबाबत अत्यंत कडक आहेत. सन २०२५ मध्ये ५० लाख तात्पुरत्या परमिटची मुदत संपत असून, त्यापैकी ७ लाख परमिट विद्यार्थ्यांचे असून काटेकोरपणामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा परमिट मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते.

ट्रुडो यांच्या या हेतूला त्यांच्याच देशात विरोध होत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोलिव्हेर यांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या धोरणांवर टीका करताना म्हटले आहे की, यामुळे तात्पुरत्या रहिवाशांसाठी अनिश्चितता निर्माण झाली आहे, आणि त्याचा देशाला फायदा होत नाही. २०२५ च्या अखेरीस सुमारे ५० लाख तात्पुरत्या रहिवाशांना देश सोडावा लागू शकतो.

नवीन वर्क परमिट देणार : सर्व तात्पुरत्या स्थलांतरितांना बाहेर पडण्याची गरज भासणार नाही, असे कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी म्हटले आहे. त्याऐवजी काहींना नवीन परमिट किंवा पदव्युत्तर वर्क परमिट देण्यात येणार आहे. मे २०२३ पर्यंत १० लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थी कॅनडात होते. २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परमिट ३५ टक्क्यांनी कमी केले. आता ट्रुडो सरकार २०२५ मध्ये त्यात आणखी १० टक्के कपात करण्याची योजना आखत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR