19.3 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रभंडा-यातील जेवणातून ७० विद्यार्थ्यांना विषबाधा

भंडा-यातील जेवणातून ७० विद्यार्थ्यांना विषबाधा

जळगाव : प्रतिनिधी
पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवानिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडा-याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देण्यात आलेल्या प्रसादातून शाळेतील ७० विद्यार्थी व चार शिक्षकांना विषबाधा झाली. त्यापैकी दोन विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे पारोळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त भंडा-याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भंडा-यात डाळ-भात, मटकीची उसळ, माठाची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागले. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली.

विषबाधा झालेल्यांत १२ ते १५ वयोगटातील एकूण ७० विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR