28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभूस्खलनात ७०० जण मातीखाली दबले

भूस्खलनात ७०० जण मातीखाली दबले

पोर्ट मोरस्बी : उत्तर पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या गावातील मृतांचा आकडा ३०० पेक्षा अधिक झाला असून शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात १,१८२ घरे गाडली गेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाने रविवारी सांगितले की, मुल्लीटाका परिसरात भूस्खलनामुळे सहाहून अधिक गावे बाधित झाली आहेत.

पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनाबाबत संयुक्त राष्ट्राकडून मोठी माहिती समोर आली आहे. भूस्खलनामुळे सुमारे ३००० हून अधिक लोक मातीखाली गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या उत्तर-पश्चिमेला सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतातील काओकलाम गावात पहाटे ३ वाजता (स्थानिक वेळेनुसार) भूस्खलन झाले. संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये सुमारे ७०० लोक गाडले गेल्याचा अंदाज आहे.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे गाळाखाली दबलेल्या लोकांची संख्या ६७० वर गेली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेचे प्रमुख सेरहन अक्टोप्राक यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामुळे १५० हून अधिक घरे गाडली गेली आहे. यांबाली गाव आणि एन्गा प्रांतातील अधिका-यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित मृतांची संख्या आहे. अक्टोप्राक यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, ६७० हून अधिक लोक मातीखाली गाडले गेल्याचा आमचा अंदाज आहे. स्थानिक अधिका-यांनी सुरुवातीला शुक्रवारी मृतांची संख्या १०० किंवा त्याहून अधिक ठेवली. तर रविवारपर्यंत केवळ पाच मृतदेह आणि एका पीडितेचा एक पाय सापडला आहे.

११०० पेक्षा अधिक घरे ढिगा-याखाली
भूस्खलनामुळे सुमारे ११०० पेक्षा जास्त घरे ढिगा-याखाली दबली आहेत. दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागरात असणा-या या देशातील एन्गा प्रांतात डोंगराळ प्रदेशात ही घटना घडली आहे.

जमीन अजूनही सरकतेय
अक्टोप्राक म्हणाले की जमीन अजूनही सरकत असल्याने बचावकर्त्यांनासुद्धा धोका आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, पाणी वाहत आहे आणि यामुळे सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR