18.9 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीय७८ बांगलादेशी मच्छिमारांना अटक

७८ बांगलादेशी मच्छिमारांना अटक

कोची : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सुरुच आहेत. सध्या बांगलादेशातील हिंदूंवर होणा-या अन्यायाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. तसेच, बांगलादेशातून भारतात येणा-या घुसखोरांचा अनेकदा चर्चेत असतो. अशातच भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत. तसेच, ७८ मच्छिमारांना भारतीय तटरक्षक दलाने अटक केली आहे. हे सर्व मच्छिमार बांगलादेशचे रहिवासी आहेत.

भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत. या अंतर्गत ७८ बांगलादेशी मच्छिमारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात भारतीय तटरक्षक दलाने समाज माध्यमांवर माहिती दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. या गस्तीदरम्यान, भारतीय सागरी क्षेत्रात काही संशयास्पद हालचाली त्यांना जाणवल्या.

तपासादरम्यान बांगलादेशातील दोन मासेमारी करणा-या नौका, एफव्ही लैला २ आणि एफव्ही मेघना ५ या कोणत्याही परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आले. या दोन्ही नौकांची नोंदणी बांगलादेशात झाली आहे आणि त्यात अनुक्रमे ४१ आणि ३७ एवढे मच्छीमार होते. भारतीय तटरक्षक दलाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही नौका अडवल्या आणि त्याचा तपास केला. यातून पकडलेल्या मच्छीमारांना पुढील कारवाईसाठी संबंधित अधिका-यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR