22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeक्रीडाऑलिम्पिकला जाणा-या भारतीय खेळाडूंना बीसीसीआयकडून ८.५ कोटींची मदत

ऑलिम्पिकला जाणा-या भारतीय खेळाडूंना बीसीसीआयकडून ८.५ कोटींची मदत

नवी दिल्ली : पॅरिसमध्ये २६ जुलैपासून ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा खेळली जाणार आहे. या खेळांच्या कुंभमेळ्या भारतीय खेळाडूही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की बीसीसीआयकडून भारतीय ऑलिम्पिर संघटनेला ८.५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की ‘मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंना बीसीसीआयकडूनही पाठिंबा दिला जाईल. आम्ही या मोहिमेसाठी आयओएला ८.५ कोटी रुपये देत आहोत. आपल्या संपूर्ण भारतीय संघाला खूप शुभेच्छा. देशाचे नाव उज्ज्वल करा.’

दरम्यान यंदा पॅरिस ऑलिम्पिकसाठी आयओएने ११७ खेळाडूंची अंतिम निवड केली आहे. तसेच या ऑलिम्पिकसाठी भारताच्या ताफ्यात ११७ खेळाडूंसह १४० सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत, ज्यात काही अधिकारीही आणि मेडिकल स्टाफही आहे. भारतीय ताफ्यातील सर्वाधिक २९ खेळाडू हे अ‍ॅथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत, त्यापाठोपाठ नेमबाजीत भारताचे २१ खेळाडू उतरणार आहेत.

याशिवाय १९ जणांचा भारतीय पुरुष संघही या स्पर्धेत सहभागी होत आहे. तसेच टेबल टेनिसचे ८ आणि बॅडमिंटनमध्ये ७ खेळाडू सहभागी होणार आहेत. कुस्ती, तिरंदाजी आणि बॉक्सिंग या खेळामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर गोल्फमध्ये ४ खेळाडू आणि टेनिसमध्ये ३ खेळाडू सहभागी होतील, तर स्विमिंगमध्ये २ आणि सेलिंग या क्रीडा प्रकारात प्रत्येकी २ खेळाडूंना संधी मिळाली आहे. घोडेस्वारी, ज्युदो, रोइंग आणि वेट लिफ्टिंग या खेळांचे प्रत्येकी १ खेळाडू भारताच्या ताफ्यात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR