33.6 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरजालन्यात बस-टेम्पोच्या भीषण अपघातात ८ ठार

जालन्यात बस-टेम्पोच्या भीषण अपघातात ८ ठार

जालना : मोसंबीची वाहतूक करणारा आयशर टेम्पो व राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या अपघातात ८ जण ठार तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली.

अपघात एवढा भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून टेम्पोतील मोसंबी रस्त्यावर विखरून पडली होती. मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली होती. महामंडळाची बस बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जात होती तर टेम्पो हा जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता. दुस-या वाहनाला मागे सारून पुढे जाण्याच्या घाईत समोरून येणा-या बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बसमध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलय. इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR