22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeराष्ट्रीयएलपीजी ट्रकच्या भीषण स्फोटात ८ ठार

एलपीजी ट्रकच्या भीषण स्फोटात ८ ठार

४० वाहने आगीच्या विळख्यात राजस्थानातील भयंकर घटना

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका ट्रकची दुस-या एलपीजी ट्रकला धडक बसली. या धडकेनंतर एलपीजी ट्रकला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर जवळपास उभ्या असलेल्या ४० वाहनांनाही आग लागली. आग एवढी भीषण होती की ५ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याच दरम्यान मागून एक ट्रक येतो, जो एलपीजी ट्रकला जोरदार धडकतो. धडकेमुळे एलपीजी ट्रकचे नोजल तुटते आणि गॅस गळती सुरू होते. गॅस गळती झाल्यानंतर काही सेकंदात मोठा स्फोट होतो आणि सर्वत्र आग दिसते.

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ३५ हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक असे आहेत ज्यांचे शरीर अपघातात ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर जयपूरमधील सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानच्या मुख्यमंर्त्यांपासून ते देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR